Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जमीन बळकावण्यासाठी हिंदू कुटुंबावर भरदिवसा हल्ला; बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

जमीन बळकावण्यासाठी हिंदू कुटुंबावर भरदिवसा हल्ला; बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

मुंबई (Bangladesh Hindu Family Attacked) : बांगलादेशच्या भोला जिल्ह्यात जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू कुटुंबाला गंभीर त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबप्रमुख गोपाल कृष्ण दास यांनी न्यायालयात जमिनीशी संबंधित सुरु असलेला खटला जिंकला होता.

मात्र, त्यानंतरही त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. भरदिवसा काही जणांनी घरात घुसून संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन वादाच्या प्रकरणात गोपाल कृष्ण दास आणि त्यांच्या पत्नी अखी राणी दास यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या दोन मुलींसोबतही गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. कुटुंबातील वृद्ध वडिलांचा पाण्यात बुडवून छळ करण्यात आला. घराची तोडफोड करण्यात आली असून काही वस्तूंची लूटही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Bangladesh Hindu Family Attacked)

हा संपूर्ण हल्ला जमीन बळकावण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप आहे. गोपाल कृष्ण दास यांच्या जमिनीवरून यापूर्वीपासून वाद सुरू होता. न्यायालयाने या प्रकरणात त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र, विरोधी पक्षाने न्यायालयाचा निर्णय मान्य न करता हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला. हल्लेखोरांनी न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसवत संबंधित जमिनीवर नांगरही फिरवल्याचे सांगितले जात आहे.

गोपाल कृष्ण दास यांचे कुटुंब सामान्य असून आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शांततेत राहण्याची त्यांची इच्छा होती. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर आता वाद संपेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, भरदिवसा घरात घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे. विशेषतः महिलांशी आणि वृद्ध व्यक्तीशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवरही गंभीर परिणाम झाला आहे. (Bangladesh Hindu Family Attacked)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai