टोकियो (Japan Earthquake) : जपानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असून, अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार, १ ऑगस्ट रोजी जपानच्या आओमोरी प्रांताजवळ ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी हा भूकंप झाला असून, त्याचे केंद्र आओमोरीच्या किनाऱ्यापासून सुमारे ८० किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपानच्या हवामान विभागाने दिली आहे.
जपानच्या हवामान विभागाने भूकंपानंतर सुनामीचा कोणताही इशारा दिलेला नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू ४१.३ अंश उत्तर अक्षांश आणि १४२.० अंश पूर्व रेखांश येथे नोंदविण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपात कोणत्याही मोठ्या जीवित किंवा वित्तहानीची नोंद झालेली नाही. मात्र, प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Japan Earthquake)
काही दिवसांपूर्वीच जपानमध्ये आणखी एका तीव्र भूकंपाने मोठे नुकसान झाले होते. मंगळवार, २८ जुलै रोजी दुपारी ४ वाजून २७ मिनिटांनी कुमामोटो प्रांतात ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे अ मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३५ वर पोहोचल्याची माहिती दिली. (Japan Earthquake)
सातत्याने होत असलेल्या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर जपानमधील आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, भूकंप प्रभावित भागांमध्ये देखरेख वाढविण्यात आली आहे. (Japan Earthquake)

