Dailyhunt
Karachi Hindu Heritage Attack : कराचीत हिंदू आस्थेवर घाला; श्रीकृष्ण-गोपिकांच्या मूर्तींची तोडफोड

Karachi Hindu Heritage Attack : कराचीत हिंदू आस्थेवर घाला; श्रीकृष्ण-गोपिकांच्या मूर्तींची तोडफोड

मुंबई : (Karachi Hindu Heritage Attack) पाकिस्तानमध्ये हिंदू आस्थेशी संबंधित सांस्कृतिक वारशावर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका सतत सुरूच आहे. ताजी घटना कराची येथून समोर आलीय. कराचीतील ऐतिहासिक 'सागन मेसन बिल्डिंग'मध्ये स्थापित भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या मूर्ती असामाजिक घटकांनी तोडफोड करून खंडित केल्या.

१९३७ मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत केवळ एक वास्तू नसून हिंदू समाजाच्या श्रद्धेचे आणि सामायिक सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक होती. एम.ए. जिन्ना रोडवरील या ऐतिहासिक इमारतीत केवळ मूर्तींची तोडफोड करण्यात आली नाही, तर संपूर्ण परिसराचीही हानी करून त्याला अपवित्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला.(Karachi Hindu Heritage Attack)

सुमारे ८९ वर्षांपासून हे ठिकाण कराचीच्या बहुसांस्कृतिक ओळखीचे प्रतीक म्हणून ओळखले जात होते. भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या मूर्तींना केवळ धार्मिक महत्त्व नव्हते, तर येथे कधीकाळी विविधता आणि सहअस्तित्वाची परंपरा जिवंत होती, याचेही ते प्रतीक होते. आज त्याच वारशाला योजनाबद्ध पद्धतीने नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक, विशेषतः हिंदू समाजाची धार्मिक स्वातंत्र्य किती असुरक्षित आहे. मंदिर, मूर्ती आणि धार्मिक स्थळांवर होणारे सततचे हल्ले तेथील मानवाधिकारांची खरी स्थिती उघड करतात.(Karachi Hindu Heritage Attack)

हेही वाचा : Umar Ahmed Ilyasi : पीओके भारताचा अविभाज्य भाग; तेथील लोक भारतात येण्यासाठी उत्सुक

पाकिस्तान दरावर इत्तेहादचे अध्यक्ष फकीर शिवा कच्छी यांनी या घटनेला अत्यंत लज्जास्पद म्हणून संबोधलेय. त्यांनी म्हटले की, हा केवळ हिंदू समाजावरच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सामायिक वारशावर हल्ला आहे. त्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की, अल्पसंख्याकांच्या श्रद्धेचा अपमान असा किती काळ चालणार? तसेच दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी आणि या ऐतिहासिक इमारतीची दुरुस्ती करून अशा ठिकाणांना २४ तास सुरक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.(Karachi Hindu Heritage Attack)

घटनेनंतर पाकिस्तानातील कट्टरतावादी मानसिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू असणेच गुन्हा बनले आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. तेथील सांस्कृतिक वारसा नियोजित पद्धतीने नष्ट केला जात आहे का, हा मुद्दाही पुढे आला आहे. कराचीतील ही घटना केवळ एक घटना नसून, द्वेषाच्या वातावरणात इतिहास आणि आस्था दोन्ही असुरक्षित असल्याचे कटू वास्तव दाखवणारा आरसा आहे.(Karachi Hindu Heritage Attack)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai