Wednesday, 27 Jan, 8.00 pm तरुण भारत मुंबई

मुख्य पान
लोकल फेऱ्या पूर्ववत मात्र सर्वांना लाेकल प्रवासाची परवानगी नाहीच !

लोकल फेऱ्या पूर्ववत मात्र सर्वांना लाेकल प्रवासाची परवानगी नाहीच !

मुंबई : प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे लोकल प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हाेत नसल्याकारणाने मध्य ,पश्चिम आणि हार्बर मार्गावर रेल्वेने आपल्या सर्व लाेकल फेर्‍या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. यास रेल्वे बाेर्डानेही परवानगी दिली आहे. शुक्रवार २९ जानेवारी पासून सर्व मार्गावर पूर्वीप्रमाणे लोकल फेऱ्या सुरु होतील.

काेराेना संक्रमणामुळे गेल्या २२ मार्चपासून लाेकलची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ जूनपासून फक्त अत्यावश्यक सेवांसाठी लाेकलची मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर वकील आणि महिलांना वेळेचे बंधन घालून लाेकल प्रवासाची मुभा देण्यात आली. सद्यस्थितीत विविध २० घटकांना लाेकल प्रवासाची मंजुरी आहे. महिलांना प्रवासाची मुभा मिळाल्याने लाेकलच्या गर्दीत वाढ झाली आहे. त्यातच विना तिकिट आणि बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे. त्यामूळे लाेकलला पुर्वीप्रमाणेच गर्दी दिसू लागली आहे. काेराेनामुळे साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एका लाेकलमध्ये ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. मात्र मर्यादित फेऱ्यामुळे लोकलमधील गर्दीत वाढ होत आहे.

सध्याच्या घडीला पूर्वी प्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर १६८५ तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसभरात १३०० लाेकल फेर्‍या चालविण्यात येत आहे. तर प्रवासी संख्या ११ लाख ५० हजारांच्या घरात पाेहाेचली आहे.परिणामी लाेकलची संख्या वाढविण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली. मात्र सर्व लाेकल फेऱ्या सुरु करण्यात येत असल्या तरी सर्वांना लाेकल प्रवासाची परवानगी नाही असे देखील रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे .

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai
Top