नवी दिल्ली: (Ruchika Singh Apology Video) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रुचिका सिंह नावाच्या मुलीचा माफी मागतानाचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. "मित्रांच्या प्रभावाखाली येऊन माझ्याकडून चूक झाली, ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे," असे म्हणत तिने जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आंदोलक मुलांना माफ करण्याचे आवाहन देशवासीयांना केले आहे. (Ruchika Singh Apology Video)
रुचिका सिंहचा माफीनामा: "माझ्याकडून मोठी चूक झाली"
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माफीनाम्याच्या व्हिडीओमध्ये रुचिका सिंहने तिची बाजू मांडली आहे. "मी मित्रांसोबत कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलक पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करत होते आणि इतरांना उकसवत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मी ते चुकीचे विधान केले. मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे बोलले ते माफीच्या लायक नाही, पण कृपया मला माफ करा. ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल." (Ruchika Singh Apology Video)
रुचिका सिंहच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नोएडामधील पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये तिचे वय २५ वर्षे नमूद करण्यात आले आहे, तर व्हिडीओमध्ये मुलीने स्वतःचे वय १५ वर्षे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. (Ruchika Singh Apology Video)
"त्या मुलांना योग्य रस्ता दाखवूया"- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ जुलैच्या रात्री इन्स्टाग्रामवर एक विशेष व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकारावर आपली भूमिका स्पष्ट केली. "या आंदोलनात माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले, तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता नाही. ही भरकटलेली मुले आहेत. हा एक सांस्कृतिक धक्का नक्कीच आहे, पण या मुलांना न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावण्यापेक्षा त्यांना मिठीत घेऊन योग्य मार्ग दाखवण्याची गरज आहे. मला त्यांना मनापासून माफ करायचे आहे." (Ruchika Singh Apology Video)

