Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मॉस्को हादरले! प्रसिद्ध रेस्टॉरंटबाहेर भीषण बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, २१ जण जखमी, रशियन तपास यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपास सुरू

मॉस्को हादरले! प्रसिद्ध रेस्टॉरंटबाहेर भीषण बॉम्बस्फोट; तीन जणांचा मृत्यू, २१ जण जखमी, रशियन तपास यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपास सुरू

मॉस्को (Moscow Bomb Blast) : रशियाची राजधानी मॉस्को येथे १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भीषण बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट कुड्रिन्स्काया स्क्वेअर परिसरातील प्रसिद्ध बाल्झी रॉसी (Balzi Rossi) रेस्टॉरंटच्या बाहेर घडला.

या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

रशियाच्या नॅशनल अँटी-टेरेरिझम कमिटी (NAC) ने दिलेल्या माहितीनुसार, एक महिला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होती. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने तिला अडवल्यानंतर अचानक स्फोट झाला. या स्फोटात संशयित महिला, सुरक्षा रक्षक आणि रेस्टॉरंटमधील एका ग्राहकाचा मृत्यू झाला. (Moscow Bomb Blast)

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये खासगी कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही व्यक्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी रशियन सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. महिला जाणीवपूर्वक स्फोटके घेऊन आली होती की तिला नकळत स्फोटकांचा वापर करण्यात आला, याचा तपास केला जात आहे. (Moscow Bomb Blast)

स्फोटानंतर संपूर्ण परिसर तात्काळ सील करण्यात आला असून बॉम्ब निकामी पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि तपास अधिकारी घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. (Moscow Bomb Blast)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai