Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नराधमाचा अंत! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या; ग्रेटर नोएडात आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार

नराधमाचा अंत! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या; ग्रेटर नोएडात आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार

ग्रेटर नोएडा (Greater Noida minor girl case) : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये सहा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत मोठी शोधमोहीम राबवली.

CCTV फुटेज आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह जवळच्या परिसरातून रात्रीच ताब्यात घेण्यात आला. तपासादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी बलराज याला अटक केली. मात्र, गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यासाठी नेले असता आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरातील गोळीबारात जखमी झालेल्या बलराजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

डीसीपी सेंट्रल नोएडा शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. २८ ऑगस्टच्या रात्री मुलीच्या पालकांनी इकोटेक पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची लेखी तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

मुलीचा सुरक्षित शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने पाच पथके तयार केली. पोलिसांनी मॅन्युअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात आली. (Greater Noida minor girl case)

रात्रीच सापडला मुलीचा मृतदेह

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू ठेवली. अथक प्रयत्नांनंतर त्याच रात्री मुलीचा मृतदेह जवळच्या परिसरातून आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डॉक्टरांचे पॅनेल तयार करून व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पोस्टमॉर्टेम करण्यात आले. तपासादरम्यान मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. (Greater Noida minor girl case)

आरोपी बलराजला अटक; पुरावे जप्त करण्यासाठी नेले

तपासादरम्यान पोलिसांनी बलराज नावाच्या आरोपीला अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यासाठी पोलिस आरोपीला 'डी पार्क'जवळील परिसरात घेऊन गेले.

तेथे आरोपीने घटनेदरम्यान पीडितेला धमकावण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांना दाखवून तो जप्त करण्यात आला. (Greater Noida minor girl case)

अचानक पोलिसांवर गोळीबार

चाकू जप्त केल्यानंतर आरोपीने झुडपांमध्ये लपवून ठेवलेले पिस्तूल बाहेर काढले आणि पोलिस पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात एक कॉन्स्टेबल जखमी झाला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पथकाने स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात आरोपी बलराज जखमी झाला. पोलिसांनी तातडीने त्याला प्राथमिक उपचार दिले आणि रुग्णालयात दाखल केले. जखमी कॉन्स्टेबललाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. (Greater Noida minor girl case)

उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू

बलराजची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जखमी कॉन्स्टेबलवर सध्या उपचार सुरू आहेत. (Greater Noida minor girl case)

दरम्यान, मृत आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याच्या पूर्वीच्या गुन्हेगारी इतिहासाची सविस्तर पडताळणी केली जात आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळ, CCTV फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला जात आहे. (Greater Noida minor girl case)

मुलीवर अत्याचार कधी आणि नेमका कसा झाला, या गुन्ह्यात आरोपीशिवाय आणखी कोणाचा सहभाग होता का आणि आरोपीच्या गुन्हेगारी इतिहासात आणखी कोणते गुन्हे आहेत, या सर्व बाबींची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अतिरिक्त पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू आहे. (Greater Noida minor girl case)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai