Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Olectra भारतातील रस्त्यांवर 4,000 इलेक्ट्रिक बस तैनात करणारी पहिली कंपनी ठरली

Olectra भारतातील रस्त्यांवर 4,000 इलेक्ट्रिक बस तैनात करणारी पहिली कंपनी ठरली

हैदराबाद : (Olectra Electric Bus) भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी 'ओलेक्ट्रो ग्रीनटेक लिमिडेट'ने देशभरातील रस्त्यांवर चार हजार इलेक्ट्रिक बस कार्यान्वित करून ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

या कामगिरीमुळे ऑलेक्ट्रा ही भारतात चार हजार 'ई-बस' तैनात करणारी पहिली कंपनी ठरली असून, देशाच्या हरित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.

हा ऐतिहासिक टप्पा हिमाचल प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एचआरटीसी)च्या ताफ्यात 297 नवीन ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिक बस दाखल करण्याच्या कार्यक्रमात साजरा करण्यात आला. यावेळी ऑलेक्ट्राची चार हजारावी इलेक्ट्रिक बस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्या हस्ते एचआरटीसीला सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाला राज्य सरकार, एचआरटीसी आणि ऑलेक्ट्राचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Olectra Electric Bus)

देशभरातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये ऑलेक्ट्राच्या चार हजार इलेक्ट्रिक बस सध्या सेवा देत असून, त्या दररोज लाखो प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या बसमुळे इंधन खर्चात बचत, कमी देखभाल खर्च आणि प्रदूषणात घट होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. (Olectra Electric Bus)

कंपनीच्या माहितीनुसार, ऑलेक्ट्राच्या चार हजार इलेक्ट्रिक बसनी आतापर्यंत 73 कोटी (730 दशलक्ष) हरित किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असून, त्यामुळे 6.5 लाख टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइड (CO₂) उत्सर्जन टाळण्यात मदत झाली आहे. (Olectra Electric Bus)

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे व्यवस्थापकीय संचालक महेश बाबू म्हणाले की, "भारतात चार हजार इलेक्ट्रिक बस तैनात करणारी पहिली कंपनी बनणे हा केवळ Olectra साठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय इलेक्ट्रिक मोबिलिटी उद्योगासाठी ऐतिहासिक क्षण आहे. स्वच्छ, हरित आणि शाश्वत वाहतुकीसाठी आम्ही पुढील काळातही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाद्वारे योगदान देत राहू." (Olectra Electric Bus)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai