मुंबई : (US-Iran) अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेला संघर्ष गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने पाकिस्तानवर मध्यस्थ म्हणून विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानने मध्यस्थीच्या भूमिकेतून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात थेट फोन संवाद सुरू असल्याचेही समोर आले आहे.
इराणचे खासदार इब्राहिम रेजाई यांनी सांगितले की, पाकिस्तानने आमचा मध्यस्ती म्हणून विश्वास गमावला आहे. पाकिस्तान अमेरिकेसमोर अनेकदा झुकतो. पाकिस्तान हा एक चांगला मित्र आणि शेजारी आहे परंतु परस्पर विश्वासातील कमतरतेमुळे पाकिस्तान हा मध्यस्ती म्हणून उपयुक्त ठरू शकत नाही.

