मुंबई : (Railway Land Illegal Construction Mumbai) मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे (पूर्व) येथील रेल्वेच्या जमिनीवरील गरीबनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील पाडकाम मोहीम सुरू ठेवण्यास प्सची रेल्वेला परवानगी दिली आहे.
मात्र, 2021च्या सर्वेक्षणानुसार पात्र ठरलेल्या झोपडीधारकाच्या हिताचे संरक्षण करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या पात्र सदस्यांच्या हिताचे संरक्षण केलेले असताना आणि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध केल्याविना पश्चिम रेल्वेतर्फे त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची बाब संघटनेच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.(Railway Land Illegal Construction Mumbai)

