Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी! दिल्लीत भाव १.४४ लाखांवर, तर आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; जाणून घ्या प्रमुख शहरांतील भाव

सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उसळी! दिल्लीत भाव १.४४ लाखांवर, तर आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण; जाणून घ्या प्रमुख शहरांतील भाव

वी दिल्ली: (Gold Price Today) देशांतर्गत सराफा बाजारात १ ऑगस्टच्या सकाळी सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ ग्राहक आणि दागिने विक्रेत्यांकडून वाढलेली मागणी यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४४,७६० रुपयांवर पोहोचला आहे. एकीकडे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव चढे असताना, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. (Gold Price Today)

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) (Gold Price Today)

दिल्ली:

२४ कॅरेट सोने: १,४४,७६० रुपये

२२ कॅरेट सोने: १,३२,७१० रुपये

मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू:

२४ कॅरेट सोने: १,४४,६१० रुपये

२२ कॅरेट सोने: १,३२,५६० रुपये

इंदूर सराफा बाजार:

सोन्याचा सरासरी भाव १,४१,५०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदी २,२०,००० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आली. (Gold Price Today)

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण अन् चांदीचे दर

रॉयटर्सच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड (Spot Gold) घसरून ४,०४९.८३ डॉलर प्रति औंस वर आले आहे. तसेच US Gold Futures चा भाव ४,१०७ डॉलर प्रति औंस इतका राहिला आहे. अमेरिकन डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांच्या कलामुळे जागतिक बाजारात हे बदल दिसून येत आहेत. (Gold Price Today)

देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव २,३४,९०० रुपये प्रति किलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट सिल्व्हरची किंमत घसरून ५७.७६ डॉलर प्रति औंस वर आली आहे. (Gold Price Today)

भविष्यातील अंदाज

तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात सोन्या-चांदीच्या किमतींवर जागतिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय व्याजदर, डॉलरचा दर आणि देशांतर्गत सणासुदीची मागणी यांचा मोठा प्रभाव राहील. (Gold Price Today)


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai