वॉशिंग्टन: (Donald Trump Iran Attack Cancellation) पश्चिम आशियामध्ये पेटलेला तणाव एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असताना, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील संभाव्य लष्करी हल्ला तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणच्या महत्त्वाच्या ऊर्जा ठिकाणांवर मोठा हल्ला करण्याची तयारी करत होते. मात्र, "आमच्यावर हल्ला झाल्यास सौदी अरेबिया, यूएई, कतारसह संपूर्ण आखातातील ऊर्जा प्रकल्प बेचिराख करू," असा थेट इशारा इराणने दिल्यानंतर सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी मध्यस्थी केली आणि अखेर ट्रम्प यांनी सैन्याला रोखण्याचा निर्णय घेतला. (Donald Trump Iran Attack Cancellation)
"दुसऱ्या महायुद्धापेक्षा भयानक हल्ला झाला असता"- डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'Truth Social' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. "अमेरिका पूर्ण लष्करी ताकदीने कारवाईसाठी तयार होती. हा दुसऱ्या महायुद्धापेक्षाही अधिक भीषण आणि भयानक हल्ला ठरला असता. परंतु इराण आणि पश्चिम आशियातील इतर देशांनी संवादाद्वारे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. जर वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्णपणे उघडले गेले, तर सध्या आम्ही हल्ला थांबवत आहोत. इस्रायलही या निर्णयाशी सहमत आहे." (Donald Trump Iran Attack Cancellation)
इराणची 'बेचिराख' करण्याची धमकी अन् सौदीची चिंता
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कीला स्पष्ट शब्दांत खडसावले होते. जर अमेरिका किंवा इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि कोणत्याही आखाती देशाने त्यांना सहकार्य केले, तर तेथील तेल साठे आणि गॅस प्रकल्प पूर्णपणे नष्ट केले जातील. इराणच्या या विनाशकारी इशाऱ्यामुळे सौदी अरेबियाची चिंता कमालीची वाढली. परिणामी, क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी थेट ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधून लष्करी कारवाई रोखण्याची विनंती केली. सध्या कतार, यूएई, तुर्की आणि पाकिस्तानही अमेरिका-इराणमधील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (Donald Trump Iran Attack Cancellation)
जागतिक तेल बाजारावर गंभीर परिणाम
अमेरिका-इराण यांच्यातील या संघर्षाचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावर तातडीने उमटले आहेत. जुलै महिन्यात ब्रेंट क्रूडच्या किमती सुमारे २४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' आणि लाल समुद्रातील वाढत्या धोक्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला कायमस्वरूपी नव्हे, तर केवळ वाटाघाटींच्या अटीवर थांबवला आहे. जर चर्चा अपयशी ठरली किंवा सागरी मार्ग पुन्हा बंद करण्यात आला, तर संपूर्ण भाग महायुद्धाच्या खाईत लोटला जाऊ शकतो. (Donald Trump Iran Attack Cancellation)

