मुंबई : (UBT Internal Disputes) उबाठा पक्ष सध्या सैरभैर झालेला आहे की काय अशी म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे.बुडत्याचा पाय खोलात असे म्हणणे यास योग्य ठरेल.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 'ऑपरेशन टायगर 'सध्या चर्चेत आहे.त्यानुसार उबाठा चे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.आणि याला पुष्टी मिळाली ते शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावतीने दिल्लीत आयोजित स्नेहभोजनास उबाठाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते.यावर स्पष्टीकरण देताना उबाठा खासदार नागेश आष्टीकर म्हणाले की, "कोणत्याही गोष्टीला एकच एंगलने बघता कामा नये.मी फक्त पाच दहा मिनिटांसाठी तिथे होतो."(UBT Internal Disputes)

