मुंबई : (Umar Ahmed Ilyasi) पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा हा प्रदेश पुन्हा भारतात सामील होईल. सध्या तेथील परिस्थिती अत्यंत वाईट असून, तेथील लोक भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत, अशी मत ऑल इंडिया इमाम ऑर्गनाइजेशनचे मुख्य इमाम उमर अहमद इल्यासी (Umar Ahmed Ilyasi) यांनी व्यक्त केले.(Umar Ahmed Ilyasi)
श्रीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असा दावा केला की, पीओकेमधील लोकांना सध्या घुसमटल्यासारखे वाटतेय. तेथील नागरिकांना तेथील नागरिकांना स्वतःलाच सार्वमत व्हावे असे वाटते, जेणेकरून ते उघडपणे आपला आवाज उठवू शकतील. इल्यासी यांनी ठामपणे सांगितले की, या प्रदेशातील लोकांना भारतामध्ये सामील होण्याची आपली इच्छा संपूर्ण जगासमोर मांडायची आहे.(Umar Ahmed Ilyasi)
हेही वाचा : Vidya Bharati Bhavan : 'शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ भौतिक प्रगती नसून संवेदनशील व राष्ट्रनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडविणे असावे' : सुरेश सोनी
पुढे ते (Umar Ahmed Ilyasi) म्हणाले की, २०१९ मध्ये केंद्र सरकारने अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठे बदल झाले आहेत. आज जम्मू-काश्मीरमध्ये उत्कृष्ट रस्ते बांधले जाताहेत. रेल्वे संपर्क सुधारला आहे, मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत आणि शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील काश्मीरमध्ये होत असलेला हा विकास पाहून सीमापार म्हणजेच पीओकेमधील लोकांच्या डोळ्यांत प्रकाश पडला आहे. ते पाहत आहेत की भारतातील काश्मीरमध्ये लोक प्रगती आणि शांततेत जगत आहेत, तर ते स्वतः दारिद्र्य आणि हालअपेष्टांना सामोरे जात आहेत.(Umar Ahmed Ilyasi)
कोण आहेत उमर अहमद इलियासी?
उमर अहमद इलियासी (Umar Ahmed Ilyasi) हे ऑल इंडिया इमाम ऑर्गेनाइजेशनचे मुख्य इमाम आहेत. त्यांनी पंजाबमधील देश भगत विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या मशिदीच्या इमामाला इतक्या उच्च पदवीने सन्मानित करण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा करण्यात आला आहे. ते दहशतवादाविरोधात ठाम आणि स्पष्ट भूमिका घेणाऱ्या मोजक्या इस्लामी विद्वानांपैकी एक मानले जातात. (Umar Ahmed Ilyasi)
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Mumbai