Dailyhunt
१६०० कोटींच्या कमाईनंतर 'धुरंधर २'वर चालली कात्री

१६०० कोटींच्या कमाईनंतर 'धुरंधर २'वर चालली कात्री

मुंबई,

Scissors running on Dhurandhar 2 'धुरंधर २' या चित्रपटाने अल्पावधीतच प्रचंड यश मिळवत कमाईचे नवे विक्रम गाठले असताना यात मोठे बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने या चित्रपटातील काही दृश्ये आणि संवादांबाबत आक्षेप नोंदवत सुधारणा करण्याचे निर्देश दिल्यानंतर निर्मात्यांनी नव्या आवृत्तीत आवश्यक बदल केले आहेत.

रणवीर सिंग आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने केवळ १८ दिवसांतच जगभरात मोठी कमाई केली आहे. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच चित्रपटातील काही त्रुटी आणि आक्षेपार्ह बाबी दूर करण्यासाठी सेन्सॉर मंडळाने हस्तक्षेप केला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कमाई करूनही, चित्रपटात प्रदर्शना नंतर करण्यात आलेल्या या बदलांमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur