Dailyhunt
१९ तास बत्ती गुल.... नागरिक संतप्त

१९ तास बत्ती गुल.... नागरिक संतप्त

पिंपरी-चिंचवड

Power outage शहरातील दापोडी, फुगेवाडी, सांगवी (जुनी-नवीन), पिंपळे गुरव आणि कासारवाडी भागांमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे तब्बल १९ तास नागरिकांना अंधारात राहावे लागले.

दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेला अंधार सकाळी सव्वा ९ पर्यंत सुरू राहिला, ज्यामुळे हजारो कुटुंबांना गंभीर त्रास सहन करावा लागला. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला.

वादळी पावसाचे वारे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्राथमिक कारण असल्याचे सांगितले जात असले तरी, काही नागरिक आणि सामाजिक संघटनांनी ही समस्या महावितरणच्या अपुऱ्या नियोजनामुळे निर्माण झाली असल्याचा आरोप केला आहे. वादळी पावसासाठी पूर्वसूचना मिळाल्यानंतरही महावितरणने का योग्य तयारी केली नाही.ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाचे अध्यक्ष सरदार रवींद्र सिंह यांनी महावितरण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला. भविष्यात अशा प्रकारच्या अंधाराच्या परिस्थिती टाळण्यासाठी वीजपुरवठा यंत्रणा मजबूत करावी आणि प्रभावित नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच महावितरणच्या तयारीवर स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण आणि शहरी भागातील power outage नागरिकांनी दिवसभराचा अंधार आणि पाण्याचा तुटवडा यामुळे आपली नाराजी व्यक्त केली. महावितरणकडून अद्याप याबाबत स्पष्ट स्पष्टीकरण आलेले नाही, परंतु प्रशासनाने लवकरच परिस्थितीचे विश्लेषण करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur