Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आई-वडिलांसारखी माया. चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद

आई-वडिलांसारखी माया. चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद

मुंबई

Eknath shinde जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक व्हिडीओ शेअर करत या प्रकारावर भाष्य केले.

या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्याविरोधात करण्यात आलेल्या टीका आणि शिवीगाळीबाबत बोलताना विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचे जाहीर केले.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, त्यांच्याबाबत तसेच त्यांच्या दिवंगत आईबद्दल वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह शब्दांचे स्वरूप अत्यंत दुर्दैवी होते. मात्र, या घटनेनंतरही त्यांनी विद्यार्थ्यांप्रती क्षमाशील भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत त्यांच्या सहभागासाठी संवाद व समजूतदारपणाचा मार्ग महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिला.दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिशेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेचे कौतुक केले.

"आई-वडिलांसारखी माया… चूक झाली तरी पोटात घेण्याची ताकद… आणि क्षमा करण्याचा मोठेपणा… असे नेतृत्व क्वचितच पाहायला मिळते," असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.पुढे त्यांनी लिहिले की, "आदरणीय पंतप्रधान यांनी आज देशातील युवकांना दिलेला संदेश हा केवळ पंतप्रधानांचा नव्हता, तर आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या एका वडिलांसारखा होता. मतभेद असू शकतात, चुका होऊ शकतात; पण आपल्या मुलांना सोडून देणे हा भारतीय संस्कार नाही. त्यांना समजावून, क्षमा करून आणि पुन्हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासात सहभागी करून घेणे हीच खरी नेतृत्वाची ओळख आहे. संवाद, सहभाग आणि विश्वास-याच पायावर सक्षम भारत उभा राहील."एकनाथ शिंदे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन आणि कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया त्यावर पाहायला मिळत आहेत.गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हिडीओ संदेश देत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्याच मालिकेतील त्यांच्या या नव्या व्हिडीओची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur