Friday, 24 Sep, 8.17 pm तरुण भारत नागपूर

होम
आणखी सुधारणा करण्याचे ध्येय : सिमरनजीत

बंगळुरू,

पुढील वर्षीच्या आशियाई स्पर्धेसह अन्य स्पर्धेत भारतीय संघाचा हिस्सा होण्यासाठी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याचे ध्येय आहे, असे भारतीय हॉकीपटू सिमरनजीत सिंग म्हणाला. त्याने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक हॉकी कांस्यपदक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

सिमरनन टोकियोत दोनवेळा गोल नोंदविले. टोकियोमध्ये मला मिळालेला अनुभव उत्तम होता. दिलेली जबाबदारी पूर्ण करणे हेच माझे ध्येय होते, असे तो म्हणाला. आता मी पुन्हा राष्ट्रीय शिबिरात परतण्याची प्रतीक्षा करीत आहे. आमच्या कामगिरीचे तपशीलवार विश्लेषण झाल्यानंतर मलला आणखी कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे, हे समजेल. सिमरनजीत हा 2016 साली लखनौ येथे एफआयएच ज्युनियर पुरुष विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचा सदस्य होता. लखनौमधील विजयाने खरोखरच माझे आयुष्यच बदलले. माझा आतापर्यंतचा प्रवास विलक्षण होता, असेही तो म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur
Top