Dailyhunt
आपकडून उपनेतेपदावरून राघव चड्ढा यांची हकालपट्टी

आपकडून उपनेतेपदावरून राघव चड्ढा यांची हकालपट्टी

नवी दिल्ली,

Raghav Chadha removed deputy leader post आम आदमी पक्षाने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल उपनेते म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.

पक्षाने राज्यसभा सचिवालयाला नोटीस पाठवून म्हटले आहे की, चड्ढा यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जाणार नाही. याचा अर्थ राघव चड्ढा यांचा बोलण्याचा वेळही राज्यसभेत कमी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, चड्ढा काही काळापासून विमानतळावरील १० रुपयांच्या चहापासून ते डिलिव्हरी बॉयपर्यंतच्या जनहितार्थ मुद्द्यांवर जोरदारपणे बोलत होते. मात्र, पक्षाशी सल्लामसलत न करता काही विशिष्ट मुद्द्यांवर बोलत असल्यामुळे आणि पक्षाला त्या मुद्द्यांबाबत माहिती न दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पक्षाच्या धोरणांचे पालन न करणे भोवले

पक्षाने अद्याप स्पष्ट कारण दिलेले नसले तरी बेशिस्तपणा आणि पक्षाच्या धोरणांचे पालन न करणे हे संभाव्य कारण मानले जात आहे. राजकीय वर्तुळात असा दावा आहे की, राघव चड्ढा आम आदमी पक्षाच्या धोरणांविरुद्ध बोलतात. अगदी अलीकडेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, तरीही चड्ढा यांनी या संदर्भात कोणतेही निवेदन दिले नाही. राज्यसभेतून त्यांचा बोलण्याचा वेळ कमी करणे आणि उपनेतेपदातून हटवणे ही पक्षाची कठोर कारवाई असून, यामुळे चड्ढा यांना मोठा धक्का बसला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur