Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आर. एस. मुंडले महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

आर. एस. मुंडले महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

नागपूर,

र. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात IQAC च्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. मंजुश्री सरदेशपांडे उपस्थित होत्या, तर IQAC सह-समन्वयक डॉ. वर्षा जपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी जनआक्रोश संस्थेचे ज्ञानेश पाहुणे, सुबोध देशपांडे आणि संदीप अग्रवाल यांनी वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच सुरक्षित वाहनचालनाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्हिडिओ सादरीकरण आणि संवादात्मक प्रश्नमंजुषेमुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रस्ता सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती दमे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भारती भुटानी यांनी केले. त्यांनी भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत उपस्थित मान्यवर, प्राचार्या, IQAC, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

सौजन्य:दीपलक्ष्मी भट ,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur