Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आसाम मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार

आसाम मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार

गुवाहाटी,

Assam cabinet expansion आसाम सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी, 5 जून रोजी होणार आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली. नवीन मंत्र्यांच्या शपथविधीसोबतच अनेक मंत्र्यांच्या खातेवाटपातही फेरबदल होण्याची शक्यता आहे.

सरमा यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करताना एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, आसाम सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 5 जून रोजी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणत्या नवीन चेहèयांचा समावेश केला जाईल किंवा कोणत्या खात्यांमध्ये बदल केला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट Assam cabinet expansion केले नसले तरी, गेल्या अनेक आठवड्यांपासून आसामच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची चर्चा सुरू आहे. या विस्तारामुळे मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरल्या जातील आणि काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो. सध्या, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त मंत्रिमंडळात केवळ चार मंत्री आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur