Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आष्टीत 'ग्रीन वॉल्ट सोलर प्लांट' विरोधात शेतकर्यांचा एल्गार!

आष्टीत 'ग्रीन वॉल्ट सोलर प्लांट' विरोधात शेतकर्यांचा एल्गार!

तळेगाव (शा. पं.),

Green vault solar plant आष्टी तालुक्यांतील किन्हाळा येथील 'ग्रीन वॉल्ट सोलर पॉवर प्लांट' प्रशासनाच्या मनमानी विरोधात आज ८ रोजी शेतकर्यांचा संताप अनावर झाला.

पांदन रस्ता बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सोलर प्लांटच्या मॅनेजर व कर्मचार्यांना धारेवर धरत, प्लांटचे मुख्य गेट बंद करून काही काळ जोरदार आंदोलन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा इंदरमारी, आलोडा आणि किन्हाळा या तीन मौज्यांमधील जमीन अधिग्रहित करून हा १०० मेगावॅटचा सोलर प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र, काही शेतकर्यांनी शेती जमीन प्लांटला दिली नाही. परंतु, या सोलर प्लांटमधून नाल्याद्वारे बाहेर सोडण्यात येणारे पावसाचे पाणी शेताच्या बांधावर येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, शिवरस्ता आणि 'किन्हाळा ते इंदरमारी' दरम्यान ये-जा करणारी जुनी पारंपरिक पांदन रस्ता सोलर प्लांटने आपल्या घशात घातल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे.green vault solar plant सोलर प्लांट प्रशासनाने शेतकर्यांना पांदन रस्त्याने जाण्यास थेट मनाई केली. यामुळे शेतकर्यांच्या संयमाचा बांध तुटला. शेतात जाण्याचा रस्ताच बंद झाल्याने संतप्त शेतकर्यांनी एकत्र येत सोलर पॉवर प्लांट गाठले. तेथील व्यवस्थापक आणि कर्मचार्यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच प्लांटचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur