Dailyhunt
आयुष नोपानी नवे जिल्हा पोलिस अधीक्षक

आयुष नोपानी नवे जिल्हा पोलिस अधीक्षक

चंद्रपूर,

Ayush nopani चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी नवे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून आयुष नोपानी चंद्रपुरात येणार आहेत.

आयुष नोपानी हे यापूर्वी जालना येथे अपर पोलिस अधीक्षक पदी कार्यरत होते. यापुढे ते चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्य करतील.ayush nopani मुमक्का सुदर्शन यांच्या काळात अवैध सावकारी व किडनी विक्री प्रकरण गाजले. या महत्त्वाच्या तपासात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. आता नोपानी यांच्या नव्या ईनिंगमध्ये त्यांच्यासाठी चंद्रपूर महानगरात येणारे ड्रग्स आव्हानात्मक विषय असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur