Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अभिनेता अंकुर वाढवेवर पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

अभिनेता अंकुर वाढवेवर पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

पुसद,

Attempted Attack on Actor Ankur Wadhave 'चला हवा येऊ द्या' फेम सुप्रसिद्ध अभिनेता अंकुर विठ्ठल वाढवे याच्यावर पुसदमध्ये प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सुमारे 20 ते 30 लोकांच्या टोळीने शुक्रवार, 29 मे रोजी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे.

मूळ पुसदकर असलेल्या अंकुर वाढवेने फेसबुक पोस्ट व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर ओढावलेली आपबीती सांगितली होती. त्यात पुसदमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली होती. अंकुर सध्या पुसदमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाचा भाग असलेले काही मित्र त्याला भेटायला आले होते. त्यातील काही जणांनी मद्यपान केले होते आणि ते शेजारच्या घरासमोर लघुशंका करत होते. या प्रकाराला अंकुर व त्याच्या सहकाèयांनी विरोध केला आणि त्यांना परत पाठवले होते. याचा राग मनात धरून, 30 ते 40 तरुणांचे टोळके घेऊन ते अंकुरला मारहाण करण्यासाठी घटनास्थळी आले. यावेळी टोळीतील काही लोकांनी अंकुरला ओळखले, त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली नाही. वसंतनगर पोलिस ठाण्याच्या मध्यस्थीने हा संभाव्य हल्ला टळला.

फेसबुकवर दिली माहिती

Attempted Attack on Actor Ankur Wadhave अंकुरने फेसबुकवर एक पोस्ट करत घडलेली माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणाला, काल पुसदमध्ये माझ्यावर 20 ते 30 लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वसंतनगर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण टळलेे. पण यावरून लक्षात येते की पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. याकदे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अंकुरच्या या पोस्टनंतर अनेक मित्र व चाहते त्याची विचारपूस करू लागले. यानंतर अंकुरने फेसबुकवर लाईव्ह येत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आपण ठीक असल्याचे सांगितले.

काय म्हणाला अंकुर..

अंकुर त्याच्या लाईव्हमध्ये म्हणाला, मला काही झालेले नाही. पुसदमध्ये शूटिंग सुरू होते. या सिनेमाचा भाग असणारे माझे मित्र भेटायला आले होते. त्यात काही असे जण होते, ज्यांनी मद्यपान केले होते. ते शेजारच्या घरावर लघुशंका करत होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून, आम्ही त्यांना परत पाठवले. त्यातील एक मुलगा, ज्याची चूक होती, तो एकटा 30-40 जण मारहाण करण्यासाठी घेऊन आला होता. यावेळी त्यातील काही लोकांनी मला ओळखले आणि अनर्थ टळला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur