Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऐन पावसाळ्यात रस्ता खोदून ठेवल्याने दिग्रसकरांचा संताप

ऐन पावसाळ्यात रस्ता खोदून ठेवल्याने दिग्रसकरांचा संताप

दिग्रस,

Digras Road शहराच्या मध्यभागातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग एनएच-161 ए वरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल मनुहार या दरम्यान रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त होते.

त्यातच आता ऐन पावसाळ्यात पुढील टप्प्याच्या कामासाठी रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून कंत्राटदाराचे डोके ठिकाणावर आहे का, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

गुरुवारपासून संततधार पावसामुळे खोदलेल्या रस्त्यातील माती व चिखल वाहून वाहतुकीसाठी सुरू असलेल्या दुसèया बाजूच्या रस्त्यावर साचत आहे. परिणामी संपूर्ण मार्ग घसरडा बनला असून दुचाकीस्वारांचे वाहन घसरून किरकोळ अपघातांची मालिका सुरू झाली आहे. पादचाèयांनाही चिखलातून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या निष्काळजीपणाबद्दल नागरिकात संताप आहे. खोदकाम सुरू असताना घटनास्थळी ना संबंधित अधिकारी दिसतात, ना अभियंते. संपूर्ण काम केवळ कामगारांच्या भरोशावर सुरू असल्याचे चित्र असून कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कामावर नियंत्रण ठेवणारा जबाबदार अधिकारी नेमका कुठे आहे, असा सवालही विचारला जात आहे.

विशेष म्हणजे, सलग पाऊस सुरू असतानाही खोदकाम थांबवण्याऐवजी ते सुरूच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, शाळा व महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दररोज याच मार्गाने जीव धोक्यात घालून येजा करावी लागत आहे. एखाद्या गंभीर दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित प्रशासन आणि कंत्राटदाराने तातडीने हस्तक्षेप करून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, चिखल व पाण्याच्या निचèयासाठी त्वरित उपाय करावेत आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur