Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अखंड सुरळीत व दर्जेदार विद्युत पुरवठा द्या..!

अखंड सुरळीत व दर्जेदार विद्युत पुरवठा द्या..!

तभा वृत्तसेवा

उमरखेड,

Kisn wankhede उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील अत्यंत गंभीर व जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या वारंवार खंडित होणाèया वीजपुरवठ्याचा प्रश्न विधीमंडळ सभागृहाच्या निदर्शनास औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करून अखंड सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्याची मागणी आमदार किसन वानखेडे यांनी गुरुवारी केली.

मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, विशेषतः बंदी (दुर्गम) भागातील गावांमध्ये 24-24 तास वीजपुरवठा बंद राहण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेक गावांत हिंस्त्र पशुदेखील शिरतात. त्यामुळे तेथील जनतेच्या जिवित्वास धोका निर्माण होऊ शकतो.

त्याचबरोबर शेतकरी, विद्यार्थी, लघुउद्योजक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतीसाठी आवश्यक असलेले विद्युत पंप, लहान उद्योग व्यवसाय आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे.या गंभीर समस्येबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही संबंधित महावितरणचे अधिकारी वेळेवर प्रतिसाद देत नाहीत. अनेकदा तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते किंवा टाळाटाळ केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीलाही महावितरणचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता यांच्यासह संबंधित जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहिले होते. जनतेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बैठकीकडे संबंधित अधिकाèयांनी दाखविलेली ही उदासीनता अत्यंत निषेधार्ह असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

या सर्व बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकारी अभियंत्यासह जबाबदार अधिकाèयांची चौकशी करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच या विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांना अखंड, सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आ. किसन वानखेडे यांनी विधानभवनात केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur