Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अलास्कातील लष्करी विमानतळावर चार्टर कोसळले, ८ ठार

अलास्कातील लष्करी विमानतळावर चार्टर कोसळले, ८ ठार

अलास्का,

Charter plane crashes in Alaska अलास्का येथील एका दुर्गम लष्करी विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघाताबाबतची प्राथमिक व धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघाताच्या वेळी संपूर्ण परिसरात दाट धुके पसरल्याने वैमानिकाला धावपट्टी दिसू शकली नाही.

यामुळे विमान उतरवण्याचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरून विमान कोसळले आणि यात सहा प्रवासी व दोन कर्मचाऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात अलास्का येथील अँकरेजच्या पश्चिमेला सुमारे ४५० मैल (७२५ किलोमीटर) अंतरावर असलेल्या केप न्यूएनहॅम लाँग रेंज रडार साईट विमानतळावर गुरुवारी घडला.

राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाजवळील दाट धुक्यामुळे विमानाचा उतरण्याचा पहिला प्रयत्न निष्फळ ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नादरम्यान वैमानिकाने पूर्णपणे उपकरणांवर अवलंबून राहून विमान उतरवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु विमान अपघातास बळी पडले. या दुर्घटनेत ठार झालेल्या दोन वैमानिक आणि सहा प्रवाशांची ओळख तात्काळ पटलेली नाही, मात्र मृतांमध्ये यूएस आर्मी कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. अलास्काच्या दुर्गम भागातील हे रडार केंद्र १९५० च्या दशकात सोव्हिएत क्षेपणास्त्र हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी बांधण्यात आले होते. सध्या या केंद्राचा उपयोग रशिया, उत्तर कोरिया आणि चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur