Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंबाळी तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती

अंबाळी तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती

45 लाखांच्या कामाचे भूमिपूजन

उमरखेड,

Ambali tirthkshetra तालुक्यातील अंबाळी येथील महानुभावपंथी भाविकांचे बारा खांडींपैकी सर्वात मोठे खांड असलेल्या पवित्रस्थळी पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून सुमारे 45 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले.

या निधीतून भाविकांच्या सोयीसाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अशा 6 शौचालये व 6 स्नानगृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे. माजी खासदार हेमंत पाटील यांनी खासदार निधीतून पर्यटन विकासासाठी हा निधी उपलब्ध करून दिला होता. रविवार, 31 मे रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. या विकासकामामुळे अंबाळी तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी येणाèया हजारो भाविकांची मोठी सोय होणार असून परिसरातील पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. पर्यटन विकास महामंडळांतर्गत हा निधी श्री प्रभू दत्तात्रय संस्थान यांना मंजूर करण्यात आला आहे.

ambali tirthkshetra भूमिपूजन कार्यक्रमास तीर्थक्षेत्र अंबाळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भीमराव चंद्रवंशी, बाळासाहेब खामणेकर, सखाराम पाटील, संजय चंद्रवंशी तसेच ठेकेदार पावडे यांच्यासह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबाळी तीर्थक्षेत्राच्या उन्नतीसाठी सुरू झालेल्या या कामामुळे भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur