Dailyhunt
अफगाण स्थलांतरितांना नेणारी बोट उलटून १९ ठार

अफगाण स्थलांतरितांना नेणारी बोट उलटून १९ ठार

अंकारा,

Boat carrying Afghan migrants capsizes तुर्कस्तानच्या किनाऱ्याजवळ एजियन समुद्रात घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अफगाण स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट अचानक उलटल्याने किमान १९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत एका लहान मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना बोडरम या किनारी भागाजवळ घडली. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बोटीतील लोकांना थांबण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत बोट अतिवेगाने पुढे जात होती. तटरक्षक दलापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात बोट नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली आणि मोठी दुर्घटना घडली.

घटनेनंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. इझमी येथून हेलिकॉप्टरसह बचाव पथके पाठवण्यात आली. या मोहिमेत अनेक स्थलांतरितांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले असून काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गंभीर जखमी असलेल्या काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून समुद्रमार्गे स्थलांतर करताना असलेले धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur