Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विधवेवर लैंगिक अत्याचार

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विधवेवर लैंगिक अत्याचार

अनिल कांबळे

नागपूर,

Widow sexually assaulted लग्नाचे आमिष दाखवून एका ४० वर्षीय विधवेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, तिच्या आधार व पॅन कार्डचा गैरवापर करून तिच्या नावावर ऑनलाइन कर्ज काढणे आणि खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीची ओळख क्लेमेंट यूजीन पिल्ले (वय ३५, रा. मानकापूर) अशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीचे जानेवारी २०२६ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर तिची आरोपीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. दोघांमध्ये नियमित फोनवर संवाद सुरू झाला आणि त्यातून जवळीक निर्माण झाली.

तक्रारीनुसार, आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला आणि त्याच आमिषावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने महिलेचे आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या प्रती घेतल्या. या कागदपत्रांचा वापर करून त्याने मोबाईल लेंडिंग ॲपद्वारे महिलेच्या नावावर कर्ज घेतल्याचा आरोप आहे. मात्र, कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे संपूर्ण आर्थिक भार पीडितेवर आला. याबाबत महिलेने आरोपीकडे जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून धमकावण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या नकळत चित्रीकरण केलेला अश्लील व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा करत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी आरोपीने महिलेकडे पैशांची मागणी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी क्लेमेंट यूजीन पिल्ले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur