Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई

अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई

वाशीम,

Illegal-moneylending : अवैध सावकारी व्यवहाराबाबत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तीन तक्रारींच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम १६ अंतर्गत सहकार, महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने , २ जुलै रोजी सहा ठिकाणी झडतीची कारवाई केली.

या कारवाईमध्ये वाशीम शहर व तालुयातील जयकिसन बाहेती, सुशिल ट्रेडर्स वाशीम, बालाप्रसाद मंत्री, प्रताप सूर्य, श्रीकृष्ण वानखेडे तसेच तेजमल दागडीया यांच्या ठिकाणी झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान कथित सावकारी व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाचे दस्तऐवज पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील) तसेच विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती गौतम वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणात पार पडली.

कारवाईमध्ये सहायक निबंधक (प्रशासन) आर. आर. सावंत, सहायक निबंधक आय. एन. काबरा, सहायक निबंधक जी. आर. फाटे, सहायक निबंधक आर. व्ही. आकुलवार यांच्यासह सहकार, महसूल व पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.

यावेळी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अवैध सावकारी व्यवहार करणार्‍या व्यक्तींबाबतची माहिती अथवा तक्रार जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम तसेच संबंधित तालुयातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात द्यावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे सहायक निबंधक (प्रशासन) आर. आर. सावंत यांनी कळविले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur