Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बाकी सर्व सुरूच; नपचे 'महावीर'मधील वॉटर एटीएम बंदच!

बाकी सर्व सुरूच; नपचे 'महावीर'मधील वॉटर एटीएम बंदच!

वर्धा,

Water ATM अतिशय अटीतटीच्या लढतील नगर पालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. ती तशी प्रतिष्ठेचीही होती. परंतु, त्यात काँग्रेसचे सुधीर पांगुळ निवडून आले. ते निवडून यावे अशी अनेकांची सुप्त इच्छा होती.

लगेच ते अ‍ॅटीवही झाले. आता सर्वही काही पुर्वपदावर आले आहे. पण, उन्हाळ्याच्या सुरुवातीला महावीर उद्यानात लावण्यात आलेले थंड पाण्याचे वॉटर एमटीएम अद्याप सुरू होऊ शकले नाही.

वर्धा नगर पालिकेतील राज्य कारभार मोठा मजेशीर आहे. महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि ८ नगरसेवक आणि एक माकपचा तर २८ सदस्य महायुतीचे आहेत. तर आघाडीचा १ आणि युतीचे ३ सदस्य स्वीकृत आहेत. भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी नगरपालिकेचे सर्व सुत्र महाविकास आघाडीकडेच आहे. निवडणुका होताच नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवले. टिळक पुतळा परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचा त्यांचा कटाक्ष आहे. याशिवाय शहरातील स्वच्छतेविषयी ते कायम आग'ही आहेत. परंतु, वर्धेकर मात्र घाणीत राहण्यातच धन्यता मानत आहेत. सध्या ते वर्धेतील पार्कींगसाठीही आग'ही आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी वर्धेतील जनहित मंच या संघटनेला सोबत घेऊन शहरात फेरफटका मारून पार्कींगची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. यासोबतच सामाजिक दायित्व हा त्यांचा मुळ पिंड असल्याने सामाजिक कामात नगराध्यक्ष पांगुळ कायम आघाडीवर असतात. अगदी १५ दिवस आधी बॅचलर रोडवर दोन हॉटेल्सला आग लागल्यावरही ते पोहोचले आणि नुकसानग'स्त युवकांना मदत देण्यासाठी त्यांनी घेतलेली भुमिका महत्त्वपुर्ण ठरते.

Water ATM दरम्यान, नगर पालिकेच्या वतीने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महावीर उद्यानात नववृत्ती फाऊंडेशनच्या तीने १ रुपयांत १ लिटर पाणी देणारे शुद्ध पाण्याचे एटीएम लावण्यात आले. त्याचे लोकार्पणही झाले. नगर पालिकेच्या वतीने वॉटर एटीएम सुरू करणारे वर्धा विदर्भातील पहिले शहर ठरले. वर्धेचा पारा ४७.६ पर्यंत पोहोचला. शहरात पाण्याचे तसे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. काही सामाजिक संघटनांनी, कारखान्यांच्या वतीने थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. परंतु, वर्धा नगर पालिकेच्या वतीने महावीर उद्यानात लागलेले वॉटर एटीएममधून पाण्याचा 'बुंद' बाहेर आला नाही. एक तर महावीर उद्यानात आवण्यात आलेले वॉटर एटीएम नेमके कोणासाठी हा एक प्रश्न आहे. १ रुपयात १ लिटर पाणी घेण्यासाठी ५ रुपयांची तिकीट काढूण जायचे काय असा प्रश्न आहे. याशिवाय महावीर उद्यानात सकाळ आणि सायंकाळी फिरायला येणारे हे सुखवस्तू घरातील आहेत. त्यांना या थंड पिण्याच्या पाण्याची गरज आहे का हा प्रश्न उस्स्थित होतो. महावीर उद्यान वॉटर एमटीएम आहे हे पादचार्‍याला माहितीच होत नाही. ते वॉटर एटीएम आतमध्ये पाण्याच्या टाकीच्या जवळ लावण्यात आले आहे. त्यामुळे गरजूला या वॉटर एटीएमचा कितपत फायदा होईल हे सांगणे कठीणच आहे. फायदा तोटा हा भाग बाजूला ठेवला तरी हे एटीएम उन्हाळा शेवटच्या टप्प्यात आला असताना अद्याप सुरूच झाले नाही. वॉटर एटीएम सुरू करण्यासाठी थ'ी फेस वीज पुरवठा असावा लागतो. तो पुरवठा नसल्याने वॉटर एटीएम सुरू झाले नसल्याचे महावीर उद्यानात रोज सकाळी फिरायला येणार्‍या एका नगरसेवकाने सांगितले. आता बघा कनेशन नाही अन् वॉटर एटीएम लावले कसे येईल थंड पाणी 'आम्ही वर्धेकरां'साठी?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur