Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बनावट नोटांचा वापर करणार्‍यांवर पोलिसांची धाडसी कारवाई

बनावट नोटांचा वापर करणार्‍यांवर पोलिसांची धाडसी कारवाई

मालेगाव,

Counterfeit currency मालेगाव पोलिसांनी बनावट नोटांचा वापर करणार्‍या एका टोळीविरुद्ध मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ५० हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच एक इनोव्हा कार जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर आंध्र प्रदेश क्रमांकाची इनोव्हा कार ए.पी. ०७ ए.सी. ४५५४ डिझेल भरण्यासाठी आली होती. कारमधील व्यक्तींनी २ हजार रुपयांचे डिझेल भरले. डिझेलचे पैसे देताना पंप कर्मचार्‍याला १ हजार रुपयांच्या खर्‍या नोटा आणि ५०० रुपयांच्या दोन बनावट नोटा देण्यात आल्या.

या नोटांवर भारतीय बच्चो का बैंक, चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले होते. नोटांबाबत संशय आल्याने पंप कर्मचार्‍याने तत्काळ वाहन थांबवण्यास सांगितले व याची माहिती पंप मालक विकास गवळी यांना दिली. त्यानंतर वाहन अडवून पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंप मालक व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली. झडतीदरम्यान कारमधून ५०० रुपयांच्या एकूण ४,७०० बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांची एकूण किंमत २३ लाख ५० हजार रुपये असून सर्व नोटांवर भारतीय बच्चो का बैंक, चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी कारमधील सर्व सात जणांना ताब्यात घेऊन वाहनासह मालेगाव पोलिस ठाण्यात आणले.counterfeit currency याप्रकरणी पंप कर्मचारी माधव केशव काटेकर वय ६१, रा. मालेगाव यांच्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७५/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहितेच्या कलम १७९ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार करीत आहेत.

छायाचित्र - पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट नोटा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur