Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बंगालमध्ये मोठा झटका! ममता बॅनर्जींचे 9 मंत्री पराभूत

बंगालमध्ये मोठा झटका! ममता बॅनर्जींचे 9 मंत्री पराभूत

कोलकाता,

Assembly-election-results-2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील तब्बल 9 मंत्री आपापल्या जागा राखण्यात अपयशी ठरले आहेत.

भाजपच्या वाढत्या लाटेमुळे अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसत आहे.

काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये TMC चे बालेकिल्ले मानले जाणारे उमेदवारही पराभूत झाले आहेत. त्यामुळे पक्षासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील सरकार स्थापनेच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur