Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक

भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक

तभा वृत्तसेवा

पारवा,

Speeding-st-bus-hits-two-wheeler : लग्नासाठी पत्नीसह तेलंगणातील पिपरेडकडे जाणाèया दुचाकीस्वाराला आदिलाबाद आगाराच्या भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

ही घटना बुधवार, 24 जून रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास रामनगरजवळील नाल्याजवळ घडली. रमेश गंगाधर तुमाने (वय 45, नागेझरी) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रमेश तुमाने त्यांच्या पत्नीसह दुचाकी क्रमांक एमएच49 के2492 ने नागेझरीवरून तेलंगणातील पिपरेड येथे लग्नसमारंभासाठी जात होते. दरम्यान, रामनगरजवळील नाल्याजवळ आले. तेव्हा आदिलाबादकडून घाटंजीकडे भरधाव जाणारी बस क्रमांक टीजी01 झेड0013 ने धडक दिली. बसची ही धडक इतकी भीषण होती की, रमेश तुमाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गाडीवरून बाजूला फेकल्या गेल्याने अपघातातून बचावल्या आहेत.

गावातील युवकांनी तत्काळ ठाणेदारांना याबाबत माहिती दिली असता पारवा ठाणेदार हेमंत चौधरी हे त्यांचे वाहनचालक राहुल राठोड आणि इतर कर्मचाèयांच्या पथकासह तातडीने घटनास्थळ गाठून ठाणेदार हेमंत चौधरी यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाते पाठवला. मृतक रमेश तुमाने यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur