Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारत 'अ' संघाचा न्यूझीलंड दौरा!

भारत 'अ' संघाचा न्यूझीलंड दौरा!

मुंबई,

India and confederation tour of new zealand न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या 'अ' संघाला वरिष्ठ संघाच्या कसोटी मालिकेपूर्वी महत्त्वाची सरावसंधी मिळणार आहे. भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' यांच्यात २४ ऑक्टोबरपासून क्राइस्टचर्च येथे तीन सामन्यांची चार दिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने मंगळवारी या मालिकेची घोषणा केली.न्यूझीलंड क्रिकेटच्या रेड-बॉल देशांतर्गत हंगामाचा भाग म्हणून या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारत 'अ' संघासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. वरिष्ठ संघाच्या कसोटी सामन्यांपूर्वी भारतीय खेळाडूंना न्यूझीलंडच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी या सामन्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणार असून, यामध्ये पाच टी-२० आंतरराष्ट्रीय, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान वेलिंग्टन येथे, तर दुसरा कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान क्राइस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सध्या भारत पाचव्या क्रमांकावर असून न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी दोन कसोटी सामन्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याआधी २०२४-२५ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला यजमानांकडून कसोटी मालिकेत ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur