Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारत-अफगाणिस्तान मालिकेच्या वेळापत्रकात बदल

भारत-अफगाणिस्तान मालिकेच्या वेळापत्रकात बदल

नवी दिल्ली,

India-Afghanistan Series भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील आगामी मालिकेबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.दोन्ही संघांदरम्यान एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, या मालिकेच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला आहे.

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील आगामी मालिकेबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.

मालिकेची सुरुवात ६ जूनपासून होणार असून पहिला कसोटी सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. हा सामना नियोजित वेळेनुसारच होणार असून तो १० जूनपर्यंत चालू शकतो. मात्र, एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. पूर्वी हा सामना १४ जून रोजी होणार होता, पण आता तो १३ जूनला खेळवला जाणार आहे. या सामन्याचे ठिकाण मात्र बदललेले नाही आणि सामना धर्मशाला येथेच होणार आहे. उर्वरित दोन वनडे सामने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच खेळवले जातील. दुसरा सामना १७ जून रोजी लखनौमध्ये, तर तिसरा आणि अंतिम सामना २० जून रोजी चेन्नई येथे रंगणार आहे.

या मालिकेकडे आगामी २०२७ एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन खेळाडूंची तंदुरुस्ती, फॉर्म आणि संयोजन यावर विशेष लक्ष ठेवणार आहे. तसेच काही युवा खेळाडूंना संधी देऊन त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकनही केले जाणार असल्याची चर्चा आहे. कसोटी मालिकेसाठी Shubman Gill याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर वनडे मालिकेतही तोच संघाचे नेतृत्व करणार आहे. एकदिवसीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलिका क्रिकेट चाहत्यांसाठी एक विशेष आकर्षण असेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur