Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भयानक...प्रसूतीदरम्यान नवजात बाळ थेट जमिनीवर

भयानक...प्रसूतीदरम्यान नवजात बाळ थेट जमिनीवर

विरार,

Newborn baby falls onto the floor विरार पश्चिम येथील डॉ. जोगळेकर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय सेवांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीवेळी नवजात बाळ थेट जमिनीवर पडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून या दुर्घटनेत बाळ गंभीर जखमी झाले आहे. सध्या त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी प्रसूतीच्या तीव्र वेदना सुरू झाल्यानंतर संबंधित महिलेला विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती जवळ आल्याने बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना सांगितले. मात्र, तिच्या तक्रारीकडे योग्य वेळी लक्ष देण्यात आले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महिला उभी असतानाच नवजात बाळ गर्भाशयातून बाहेर पडून सुमारे अडीच ते तीन फूट उंचीवरून थेट जमिनीवर कोसळले. या अपघातात बाळाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला तातडीने ठाणे येथील एनआयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जोगळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या घटनेची वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur