Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'भीम जयंती' चित्रपटाला 'बेस्ट सोशल फिल्म' पुरस्कार

'भीम जयंती' चित्रपटाला 'बेस्ट सोशल फिल्म' पुरस्कार

वर्धा,

Bhim jayanti film wins कलेची नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापूर शहरात नुकताच 'कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' उत्साहात पार पडला. या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'भीम जयंती' या मराठी चित्रपटाला 'बेस्ट सोशल फिल्म' (सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट) महाराष्ट्र २०२६ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बुधवार २७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'भीम जयंती' चित्रपटाने आपल्या कथानकाद्वारे आणि प्रभावी सादरीकरणामुळे सामाजिक विषयाची मांडणी अत्यंत उत्कृष्टपणे केली आहे, यावर महोत्सवात शिकामोर्तब झाले. हा चित्रपट वर्धा येथील उमेश क्रिएशन अ‍ॅण्ड फिल्म्सचे निर्माते उमेश म्हैसकर यांनी निर्माण केला आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे नाव चित्रपटसृष्टीत अभिमानाने उंचावले असून, ही सर्व वर्धेकरांसाठी गौरवास्पद गोष्ट ठरली आहे.

या भव्य पुरस्कार सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील अनेक नामांकित व्यतींनी हजेरी लावली होती. यामध्ये मुंबईहून आलेले चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार सुधाकर शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्व संचालक, तसेच कोल्हापूरचे लाडके आणि प्रसिद्ध स्टॅण्ड-अप कॉमेडियन आनंद कोष्टी प्रामुख्याने उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन महादेव साळुंखे यांनी केले होते.bhim jayanti film wins या दिमाखदार सोहळ्यासाठी र्व्घेतून विशेषतः वर्षा म्हैसकर, यशवंत भांडेकर, उज्ज्वला भांडेकर, प्रशांत तोतला, तुकाराम शिंदे, मनीष तराळे आदी मान्यवर उपस्थित होते. भीम जयंती चित्रपटाला मिळालेल्या या यशाबद्दल संपूर्ण चित्रपटसृष्टीसह सर्वच स्तरातून निर्माते उमेश म्हैसकर आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur