Dailyhunt
बिहारमध्ये एनआयए आणि एटीएसची मोठी धाड

बिहारमध्ये एनआयए आणि एटीएसची मोठी धाड

नालंदा,

Major raid by NIA and ATS in Bihar बिहारमधील नालंदा येथे शस्त्रसाठा आणि तस्करीच्या संशयावरून तपास यंत्रणांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाने एकत्र येत पहाटेच्या सुमारास विविध ठिकाणी छापे टाकले.

पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लाहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागात एकाच वेळी अनेक ठिकाणी तपास सुरू करण्यात आला आहे. बंदुकीचे दुकान, दागिन्यांची दुकाने तसेच काही निवासस्थाने यांचा समावेश या कारवाईत असून, विशेषतः 'पीके गन हाऊस' येथे तपास अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित आहे. दुकानात असलेल्या शस्त्रसाठ्याची सखोल तपासणी केली जात असून, परवानाधारक शस्त्रांच्या नोंदींची पडताळणीही केली जात आहे.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक शेख साबिर करत असून, सुमारे शंभरहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. अनेक वाहनांद्वारे पथके विविध ठिकाणी पोहोचली असून, संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने राबवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक पोलीस ठाण्यांना मर्यादित माहिती देण्यात आली असून, छाप्याचे नेमके कारण अद्याप उघड करण्यात आलेले नाही.या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur