Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिहारमध्ये गंगा घाटावर भीषण नाव दुर्घटना; 2 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता

बिहारमध्ये गंगा घाटावर भीषण नाव दुर्घटना; 2 जणांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता

बाढ़,

Horrific Boat Accident बिहारच्या बाढ़ जिल्ह्यातील प्रसिद्ध उमानाथ गंगा घाटावर आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. डायरा परिसराकडे जाणारी एक नाव अचानक गंगा नदीत पलटी होऊन बुडाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या नावेत एकूण 14 जण प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी काही नागरिक उमानाथ गंगा घाटावरून डायरा भागात जात असताना ही घटना घडली. नदीच्या मध्यभागी आल्यानंतर नाव अचानक असंतुलित झाली आणि काही क्षणांतच उलटून पाण्यात बुडाली. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

या घटनेत आतापर्यंत 7 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, तर 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित 5 जणांचा शोध सुरू असून बचाव पथकाकडून नदीत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. Horrific Boat Accident बाढ़चे एसडीओ गरिमा लोहिया आणि एसडीपीओ रामकृष्ण स्वतः पथकासह उमानाथ घाटावर तळ ठोकून आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि बचाव पथके संयुक्तपणे शोधकार्य करत आहेत. घाट परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर उर्वरित लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur