Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बिट मार्शलवर हल्ला करुन डाेके फोडले

बिट मार्शलवर हल्ला करुन डाेके फोडले

- शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आराेला अटक

अनिल कांबळे

नागपूर,

Attack on Beat Marshal वाठाेडा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान एका बिट मार्शलवर हल्ला करून त्याचे डाेके फोडल्याची धक्कादायक घटना घडली.

या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आराेपीला अटक करण्यात आली. रविराज रघुवीर बघेल (वय 28) असे आराेपीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत वाहतूक पाेलिस आणि बीट मार्शलवर हल्ला हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाेलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी साैजन्याने वागण्यासंदर्भात गांभीर्य दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Attack on Beat Marshal सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठाेडा पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेले बिट मार्शल शशिकांत पटाेले आणि हाेमगार्ड श्रीराम आखरे यांच्यासह रविवारी मध्यरात्रीनंतर परिसरात गस्त घालत हाेते. साेमवारी पहाटे सुमारे अडीच वाजता तिडके नगर येथील एका किराणा दुकानाजवळ काही युवक संशयास्पदरीत्या उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी युवकांना समज देत घरी जाण्यास सांगितले. यावेळी इतर युवक तेथून निघून गेले. मात्र, शिवणकर नगर झाेपडपट्टीतील रहिवासी रविराज रघुवीर बघेल (वय 28) हा बिट मार्शलशी वाद घालू लागला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रविराजने शिवीगाळ करत बिट मार्शलशी झटापट केली. त्यानंतर हातातील धातूच्या कड्याने शशिकांत पटाेले यांच्या डाेक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात त्यांचे डाेके ुटून ते जखमी झाले. दरम्यान, हाेमगार्ड श्रीराम आखरे यांच्या मदतीने आराेपीला ताब्यात घेण्यात आले. वाठाेडा पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आदी कलमांन्वये गुन्हा नाेंदवून अटक केली. पाेलिस तपासात रविराज बघेल याच्याविरुद्ध नंदनवन पाेलिस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीसह इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे. पुढील तपास वाठाेडा पाेलिस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur