Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम

मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍याचा इशारा

बुलढाणा,

Heavy rainfall in Buldhana बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

४ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहण्याची शयता असून, मध्यम ते मुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ४ आणि ५ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शयता आहे. या कालावधीत एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शयता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकर्‍यांनी विशेष दक्षता घ्यावी. ६ आणि ७ जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शयता असली तरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. या काळातही काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. सततच्या पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि सखल भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शयता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त किंवा पाण्याखालील मार्गांचा वापर टाळावा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. शेतकर्‍यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज असल्याने संपूर्ण विभागात पावसाचे सक्रिय वातावरण कायम राहण्याची शयता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur