Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चर्चांना उधाण! मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट

चर्चांना उधाण! मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट

मुंबई/नवी दिल्ली

Narendra Modi दिल्लीतील राजकारणात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची अचानक होणारी भेट नेहमीच चर्चेचा विषय ठरते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील भेटीनंतरही असेच चित्र निर्माण झाले असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान झालेली ही भेट केवळ औपचारिक नसून महत्त्वाच्या रणनीतीचा भाग असल्याचे विरोधकांचे मत आहे.

फडणवीस यांनी या भेटीत महाराष्ट्रातील विकास प्रकल्प आणि विविध योजनांवर चर्चा झाल्याचे सांगितले असले तरी, बैठकीदरम्यान त्यांच्या हातातील फाइल आणि त्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या चर्चांमुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वासोबत सुरू असलेल्या सलग बैठका, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सक्रिय उपस्थिती यामुळेही राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

महायुतीतील भारतीय Narendra Modi जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषद जागावाटपावर सुरू असलेला तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ११-४-२ असा संभाव्य फॉर्म्युला चर्चेत आहे, ज्यामध्ये भाजपला ११, शिवसेना शिंदे गटाला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही महत्त्वाच्या जागांवर अजूनही एकमत झालेले नाही.विशेषतः नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवरून भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचे समजते. या दोन्हीपैकी किमान एक जागा आपल्याकडे राहावी असा भाजपचा आग्रह असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे रायगड आणि पुणे या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर परभणीची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची चर्चा आहे.

दरम्यान, दिल्लीत सुरूNarendra Modi असलेल्या या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडकडे रवाना झाले असून, मुख्यमंत्री फडणवीस अद्याप दिल्लीतील बैठकांमध्ये व्यस्त आहेत. यावरून महायुतीतील अंतिम निर्णय अद्याप केंद्रीय पातळीवर प्रलंबित असल्याचे संकेत मिळत आहेत.फडणवीस-मोदी भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होणार का, तसेच जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला कधी निश्चित होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांतNarendra Modi महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे निर्णय आणि नव्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur