Dailyhunt
'द फॅमिली मॅन'चा चौथा सीझन लवकरच भेटीला!

'द फॅमिली मॅन'चा चौथा सीझन लवकरच भेटीला!

मुंबई

The family man ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली द फॅमिली मॅन ही वेब सिरीज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेच्या चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मालिकेत 'श्रीकांत तिवारी'ची भूमिका साकारणारे मनोज बाजपेयी यांनी अलीकडेच चाहत्यांशी संवाद साधताना मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, चौथा सीझन नक्की येणार असून आतापर्यंतच्या कथेत उरलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

2019 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने पहिल्याच सीझनपासून प्रेक्षकांची मनं जिंकली. एका सामान्य कुटुंबवत्सल माणसाची आणि गुप्तचर एजंटची दुहेरी भूमिका लोकांना खूप आवडली. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभू हिने साकारलेली भूमिका विशेष गाजली आणि मालिकेला the family man आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली. तिसऱ्या सीझनमध्ये कथा अधिक गुंतागुंतीची झाली होती. आता चौथा सीझन 2027 मध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur