Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दाते अध्यापन महाविद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात

दाते अध्यापन महाविद्यालयात गुरु पौर्णिमा उत्साहात

तभा वृत्तसेवा

यवतमाळ,

Date college of education अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालय यवतमाळ व भारतीय शिक्षण मंडळ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सवाचा कार्यक्रम दाते अध्यापन महाविद्यालयात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून भारतीय शिक्षण मंडळ विदर्भ प्रांत मंत्री व प्राचार्य डॉ. राजेश शिंगरु होते. तर प्रा. राम पंचभाई, प्रा.कैलास बोके, प्रा. शितल माकोडे, कार्यक्रम प्रभारी प्रा. डॉ. नीता देवतळे उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने झाली. प्रथम वर्षाच्या वैष्णवी नैताम व नेहा सिडाम या विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेनिमित्त भाषण केले. प्रा. राम पंचभाई यांच्या भाषणानंतर मुख्य अतिथी प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू म्हणाले गुरुजी हे ज्ञानाचे व संस्काराचे विद्यापीठ असुन, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही बाबीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी, कृतज्ञता मानण्याची तयारी व स्वतःकडे लक्ष देणे या बाबी असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी हा स्वतःची प्रगती करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत यांनी गुरु शिष्य परंपरे संदर्भात विविध ग्रंथ व सध्यास्थितीतील विविध उदाहरणे व दाखले देऊन विद्यार्थ्यांनी व गुरुजींनी गुरुशिष्य परंपरा जपली पाहिजे, ही भारतीय संस्कृती तेव्हाच टिकून राहू शकते, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन द्वितीय वर्षाची छात्रध्यापक अस्मिता पवार यांनी केले. प्रास्ताविक मोनिका उमरे हिने केले. परिचय मोहन मडावी यांनी करून दिला.date college of education तर आभारप्रदर्शन खुशी शेख हिने केले.

कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. नीता देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली संत रविदास ग्रुपचे विद्यार्थी ज्योती पेटकर, अवंतिका कदम, पूर्वा जिरापूरे, साक्षी गेडाम यांनी परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur