Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देशरक्षकांसाठी राखी भेट

देशरक्षकांसाठी राखी भेट

नागपूर,

Inner Wheel Club of Nagpur रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमारेषेवर कार्यरत असलेल्या भारतीय शूर जवानांप्रती प्रेम, स्नेह आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ नागपूरतर्फे सुमारे ३,००० हस्तनिर्मित राख्या प्रहार समाज जागृती संस्थेकडे सुपूर्द करण्यात आल्या.क्लबच्या अध्यक्षा पूजा साओजी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या राख्या केडीएस स्कूल व मातृशक्ती गर्ल्स येथील विद्यार्थिनींनी देशसेवेतील जवानांप्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून प्रेमपूर्वक तयार केल्या. विशेष म्हणजे, सिद्धी या चिमुकलीने एकट्याने जवळपास १,००० राख्या तयार करून या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.

या राख्या फ्लाइट लेफ्टनंट शिवानी देशपांडे तसेच प्रहार समाज जागृती संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती देशपांडे यांनी स्वीकारल्या. त्यांनी इनर व्हील क्लब, विद्यार्थिनी आणि लहान स्वयंसेवकांनी देशरक्षकांविषयी व्यक्त केलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेचे कौतुक केले.यावेळी क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया खानजोडे, खजिनदार रुचिका वानखेडे, क्लब समन्वयक डॉ. मीनल दवांडे तसेच लक्ष्मी झा उपस्थित होत्या.

सौजन्य: मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur