Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देशात मोठा दहशतवादी कट उधळला; ९ संशयित जेरबंद

देशात मोठा दहशतवादी कट उधळला; ९ संशयित जेरबंद

नवी दिल्ली,

Terrorist Plot Foiled in the Country देशातील प्रमुख शहरांमध्ये दहशत निर्माण करण्याचा कथित कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. विशेष पथकाने केलेल्या कारवाईत नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांचे संबंध पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि मुंबईतील गुन्हेगारी नेटवर्कशी असल्याचा संशय तपासातून समोर आला आहे.

या कारवाईमुळे संभाव्य मोठा धोका टळल्याचे मानले जात आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी देशातील विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्यांची योजना आखत होते. यामध्ये सरकारी कार्यालये, सुरक्षा यंत्रणांशी संबंधित आस्थापने, विमानतळ, रेल्वे स्थानके, ऊर्जा प्रकल्प आणि इतर धोरणात्मक स्थळांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष पथकाने केलेल्या छाप्यांदरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटक साहित्य आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या गटाचा उद्देश देशातील विविध भागांत भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि सुरक्षा व्यवस्थेला लक्ष्य करणे हा होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील काही रहिवाशांचा समावेश असून काही परदेशी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान या नेटवर्कचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्यामागील सूत्रधारांविषयी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आरोपींची कसून चौकशी करत असून या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा शोध घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील संवेदनशील ठिकाणी सतर्कता वाढवली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur