Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'देवघर ऑन रेंट'मध्ये मराठी सिनेमाची दाक्षिणात्य अॅक्शनशी सांगड

'देवघर ऑन रेंट'मध्ये मराठी सिनेमाची दाक्षिणात्य अॅक्शनशी सांगड

मुंबई

Devghar on rent दिवसेंदिवस मराठी चित्रपटांची व्याप्ती जागतिक पातळीवर वाढत जाणे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या मराठी चित्रपटांच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी देशातील विविध प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञही उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

याच पार्श्वभूमीवर अनोख्या शीर्षकामुळे आणि विषयामुळे चर्चेत आलेल्या दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या 'देवघर ऑन रेंट' या आगामी मराठी चित्रपटात दाक्षिणात्य कलाकार आणि तंत्रज्ञांचा सहभाग पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह बेळगांव, हैद्राबाद, इंदौर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.

आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी 'देवघर ऑन रेंट'चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा, पटकथा आणि संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.चित्रपटासंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली असून, 'केजीएफ'फेम अभिनेता गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकार 'देवघर ऑन रेंट'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'देवघर ऑन रेंट' या शीर्षकावरूनच चित्रपटात आध्यात्माची सांगड घातलेली कथा पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र, या कथेला दमदार अॅक्शनचीही जोड देण्यात आली आहे. अॅक्शनच्या बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे वेगळे स्थान असून, गेल्या काही वर्षांत हिंदी भाषिक प्रेक्षकांनीही दाक्षिणात्य शैलीतील अॅक्शनला मोठी पसंती दिली आहे. आता त्याच धाटणीची अॅक्शन मराठी चित्रपटात पाहण्याची संधी 'देवघर ऑन रेंट'च्या माध्यमातून मिळणार आहे.'पुष्पा'फेम अॅक्शन मास्टर devghar on ren कार्तिक डंगरी यांनी चित्रपटातील अॅक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी अॅक्शनदृश्ये हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार असून, त्यासाठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोलामोलाच्या निर्मितीमूल्यांचा समावेश करण्यात आला आहे."दमदार अॅक्शन ही चित्रपटाच्या कथेची गरज होती. चित्रपटातून जे काही सादर करायचे आहे, ते प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करणारे असावे, या भावनेतून धडाकेबाज अॅक्शनचा समावेश करण्यात आला आहे," असे निर्माते सचिन रोडे पाटील यांनी सांगितले.दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनीही चित्रपटातील अॅक्शन आणि दाक्षिणात्य कलाकारांच्या सहभागाबाबत भूमिका स्पष्ट केली. केवळ रसिकांचे लक्ष वेधण्यासाठी दाक्षिणात्य अॅक्शन मास्टर कार्तिक डंगरी यांची निवड करण्यात आलेली नाही, तर त्यांचे काम पाहून प्रेक्षकही निश्चितच समाधानी होतील, असे त्यांनी सांगितले. नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या पटकथेतील अॅक्शन प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर काम केले असून, ते तेथे लोकप्रिय आहेत. चित्रपटातील दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांसाठी त्यांच्या तोडीच्या मातब्बर कलाकारांची गरज होती आणि दोघांनीही निर्मात्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे, असे सावंत यांनी नमूद केले. 'देवघर ऑन रेंट' हा आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालणारा चित्रपट असल्याचे सांगताना, आजची गोष्ट मांडणाऱ्या या चित्रपटातील आध्यात्माचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.'देवघर ऑन रेंट'मध्ये निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना सुमधुर स्वरसाज दिला असून, किशोर दळवी यांनी कोरिओग्राफी केली आहे.चैतन्य साळुंखे यांनी चित्रपटाचे डीओपी म्हणून सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे, तर पार्श्वसंगीत रोहित नागभीडे यांनी केले आहे. कला दिग्दर्शन दिलीप कंधारे यांचे असून, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी आणि रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे. अनुनेहा घोडके या कार्यकारी निर्मात्या असून यश सणस यांनी निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंडची जबाबदारी सांभाळली असून, शर्मा यांच्या टीमने प्रकाशयोजना केली आहे. विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.मराठी चित्रपटाला दाक्षिणात्य कलाकार, तंत्रज्ञ आणि अॅक्शनच्या भव्य शैलीची जोड देत 'देवघर ऑन रेंट'ने प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता निर्माण केली आहे. आध्यात्म, नाट्यमय घडामोडी आणि धडाकेबाज अॅक्शन यांचा मेळ असलेला हा चित्रपट २५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur