Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देवग्राममध्ये दारूबंदीसाठी तरुणाई एकवटली

देवग्राममध्ये दारूबंदीसाठी तरुणाई एकवटली

नागपूर,

Youth in devgram unite for liquor ban देवग्राम येथे झालेल्या ग्रामसभेत गावातील दारूबंदीचा मुद्दा चर्चेत आला. दारूच्या व्यसनामुळे युवक तसेच कुटुंबांवर होणारे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम लक्षात घेता गावात दारूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे.

भाजपा ओबीसी मोर्चा नागपूर जिल्हा ग्रामीण (काटोल)चे महामंत्री प्रविण बबनराव लोहे यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा मुद्दा मांडला. गावातील युवक, महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येत दारूबंदीच्या दिशेने ठोस प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दारूमुक्त देवग्रामसाठी जनजागृतीसोबतच ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, देवग्रामच्या विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याची माहिती ग्रामसभेत देण्यात आली. समाजमंदिरासाठी २० लाख रुपये, वॉर्ड क्रमांक १ मधील रस्त्यासाठी ८७.९४ लाख रुपये, वॉर्ड क्रमांक २ व ३ मधील माठवाणातील गटारे बांधकामासाठी ८३.१७ लाख रुपये, वॉर्ड क्रमांक १ मधील गावठाणातील गटारे बांधकामासाठी ९२.३० लाख रुपये, वॉर्ड क्रमांक २ व ३ मधील माठवाणातील गटारे बांधकामासाठी ९७.३१ लाख रुपये, सार्वजनिक शौचालयासाठी १५ लाख रुपये आणि गुरांच्या पाण्यासाठी हौद बांधण्यासाठी ६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व विकासकामांसाठी एकूण ४०१.७२ लाख रुपये म्हणजेच ४ कोटी १ लाख ७२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

देवग्रामच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार चरणसिंगजी ठाकूर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. गावाच्या विकासासोबतच सामाजिक वातावरण निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यावरही ग्रामसभेत भर देण्यात आला. त्यामुळे 'विकासासोबतच दारूमुक्त देवग्राम' असा संकल्प करण्यासाठी तरुणाई पुढे सरसावल्याचे चित्र ग्रामसभेत पाहायला मिळाले.

सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur